आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:एमएचएसएस हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिंदखेडा येथे गुणगौरव

शिंदखेडा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित एमएचएसएस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच अँग्लो उर्दू हायस्कूलमधील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

अध्यक्षस्थानी माजी सभापती प्रा. सुरेश देसले होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल देसले, पोलिस निरीक्षक सुनील भाबड, संस्थेचे सचिव आनंद चौधरी, संचालक आधार महारू पवार, डॉ. एन.पी. पाटील, प्रा.प्रदीप दीक्षित, चंद्रशेखर चौधरी, मोतीलाल पवार, नगरसेविका वंदना परमार, चेतन परमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सुनील भाबड, संचालक आधार महारू पवार, प्रा.प्रदीप दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य टी.एन. पाटील, मुख्याध्यापक के.बी. अहिरराव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एन. नेरपगार, सूत्रसंचालन प्रा. अजय बोरदे व प्रा.माधुरी पवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.दीपक माळी यांनी केले. दरम्यान, २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिनही हायस्कूलमध्ये साजरा झाला. योगा दिनानिमित्त शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आर. पी. चौधरी यांनी विद्यार्थ्यांकडून योगा करून घेत योगाचे महत्त्व विशद केले.

बातम्या आणखी आहेत...