आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळप:मेट्रिक टन उसाचे गाळप; 4 लाख 60 हजार मे.टन ऊस सातपुडा कडून गाळप

शहादा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथील सातपुडा साखर कारखान्याने यंदा ४ लाख ६० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, या वर्षीचा गळीत हंगाम १३ जून रोजी उशिरा रात्रीपर्यंत संपणार असल्याचे संकेत कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, डॉ.रवींद्र चौधरी यांनी दिले आहेत.ऊस उत्पादकांच्या सहकार्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विविध अडचणींवर मात करून सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे सुरू आहे. ऊस उत्पादक सभासदांच्या विश्वासामुळे या वर्षीच्या गळीत हंगामात जून महिन्यापर्यंत कारखाना सुरू राहिला.

कोणत्याही ऊस उत्पादकाच्या ऊस शिल्लक राहू दिला नाही, असेही त्यांनी सांगितले. कारखाना पूर्ण क्षमतेने चालावा म्हणून साखर कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले. शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडण्यापासून तर साखर कारखान्यापर्यंत आणण्यासाठी सर्व यंत्रणा राबवली. ऊसतोड कामगारांनादेखील आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या. गेल्या वर्षी ऊस लागवडीचे प्रमाण अधिक असल्याने कारखान्याला ऊस क्षमतेप्रमाणे मिळाला, अशी माहिती कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.

सर्व ऊस उत्पादकांच्या विश्वास, संचालक मंडळाने केलेले प्रयत्न यामुळे कारखाना सुरळीतपणे सुरू राहिला. सभासद, व्यापारी, पतसंस्था यांचा मोठा हातभार त्यासाठी लागला. ऊसतोड कामगार, अधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतूकदार, मालक-चालक यांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे कारखाना अखेरपर्यंत सुरळीतपणे सुरू राहिला. भविष्यातही अशाच सहकार्याची अपेक्षा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, रवींद्र चौधरी यांनी व्यक्त केली.

४ लाख ११ हजार ८७५ क्विंटल साखर उत्पादन
या वर्षी हंगामात ४ लाख ६० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले. तर साखरेचा उतारा सरासरी ९.३ असून ४ लाख ११ हजार ८७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. ज्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला ऊस दिला त्यांचे पेमेंटही वेळेवर देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...