आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविज वितरण कंपनीच्या अधिकारी व कामगारांनी मंगळवारी मध्यरात्री संप सुरू केला. सबस्टेशन, फिडरवर काम करणारी यंत्रणा देखील संपात सहभागी झाल्यामुळे विजपुरवठात येणाऱ्या अडचणींच्या निराकरण करण्यास कोणीच उपलब्ध नव्हते. सकाळी संपाची धग अधिकच तिव्र झाली. वीज कंपनीने केलेली पर्यायी व्यवस्था देखील फारसी लाभदायक नसल्याने वीज पुरवठ्याच्या अडचणींच्या तक्रारी प्रचंड वाढल्या. शहरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या सबस्टेशन अंतर्गत फिडरवर वारंवार ब्रेक डाऊनच्या तक्रारी राहिल्या.
सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान संपूर्ण एमआयडीसीचा वीजपुरवठा खंडित राहिला. दरम्यान सायंकाळी कामगारांनी संप मागे घेतल्यानंतर दुरुस्तीचे कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली. महावितरण कंपनीचे खासगीकरण होत असल्याचा आरोप करीत वीज कामगार संघटनांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. या संपात धुळे जिल्ह्यातील एक हजार ४४ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. सकाळच्या सत्रातील ६३६ पैकी ५९६ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. त्यात अभियंता, उपअभियंता, तंत्रज्ञान, लाईनमन अशा सर्वच घटकांचा समावेश राहिला. सर्व कामगारांनी अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या लगत एकत्र येत जोरदार निदर्शने केली. या शिवाय शहरातील सबस्टेशनच्या कार्यालयाच्या बाहेर देखील तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
तसेच आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कार्यक्षेत्रातून आंदोलनस्थळी धाव घेतल्याने सर्व फिडर, पॉवर स्टेशन, सबस्टेशन येथील कार्यान्वयन आहे त्या स्थितीत राहिली. सकाळ नंतरच विजेच्या ब्रेक डाऊनच्या तक्रारी सुरू झाल्या. वीज वितरण कंपनीने तक्रारीच्या निराकरणासाठी पर्यायी व्यवस्था केलेली होती. मात्र सबस्टेशनच्या तांत्रीक अडचणी पर्यायी कर्मचाऱ्यांना समजत नसल्यामुळे समस्यांचे निराकरण होऊ शकले नाही. तर एमआयडीसी परिसरातील बसस्टेशनवर लोडमुळे सकाळ पासूनच ब्रेक डाऊनच्या तक्रारी वाढल्या.
पोलिस बंदाेबस्तात फिडर आणि सबस्टेशन
विज कंपनीचे सर्व अधिकारी व कामगार संपात सहभागी झाल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या सर्व मालमत्ता सकाळीच ओस पडल्या होत्या. संपाच्या दरम्यान कोणताच गैरप्रकार होऊ नये या उद्देशाने सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. होता.
पर्यायी यंत्रणा कुचकामी
संप कालावधीत पर्यायी व्यवस्था केली होती. मात्र ही यंत्रणा अत्यंत कुचकामी ठरली. सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि इतर विभाग तसेच खासगी ठेकेदारांच्या मनुष्यबळाला सबस्टेशन वरील तांत्रिक माहिती नसल्यामुळे तक्रारी आल्यानंतर देखील कामे झाली नाहीत.
संप मिटल्यानंतर सायंकाळी कामावर
विज कामगारांनी सुरू केलेला संप सायंकाळी ४ वाजेला राज्यस्तरावरील बैठकीनंतर मिटला. संप मिटल्यानंतर तातडीने कामगार आंदोलन स्थळावरुनच त्यांच्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी रवाना झाले. पहिल्या प्राधान्याने खंडीत वीजपुरठा दुरुस्तीला प्राधान्य दिले.
दुपारी ११ ते १ दरम्यान पुरवठा खंडित
सकाळीच एमआयडीसीतील वॉटर फिडर, निर्मल फिडर, पॉवर फिडर, सुनवकार फिडरवरील पुरवठा बंद पडला. उद्योजकांच्या तक्रारी नंतर अधीक्षक अभियंता म्हस्के घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर खासगी कामगारांच्या मदतीने काही अडचणींचा निपटारा करण्यात आला. दरम्यान दुपारी ११ ते १ दरम्यान संपूर्ण एमआयडीसी परिसरात वीज पुरवठा खंडीत होता. दिवसभर एमआयडीसी सबस्टेशनवर सातत्याने ब्रेक डाऊनच्या घटना घडत राहिल्या. तर शहरात बुधवारी दिवसभरात फारशा अडचणी आल्या नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.