आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळेकरांना हुडहुडी:किमान तापमान दुसऱ्या‎ दिवशीही 7 अंशांवर स्थिर‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीचे‎ प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपासून किमान‎ तापमान ७.८ अंश सेल्सिअसवर स्थिर आहे. तसेच‎ कमाल तापमान २८ अंशांवर आल्याने दिवसभर‎ गारठा जाणवत असल्याचे चित्र आहे.‎ काही दिवसांपासून कमाल व किमान तापमान‎ कमी होते आहे. किमान तापमान १० अंशाखाली‎ असल्याने धुळेकरांना हुडहुडी भरली आहे.‎

सायंकाळी सात वाजेनंतर गारठा वाढण्यास सुरुवात‎ हाेते. थंडी वाढल्याने रात्री रस्त्यावरील वाहतूक‎ मंदावली आहे. दिवसाही गार वारे वाहत असल्याने‎ गारठा जाणवतो. शहरात रविवारी किमान तापमान‎ ९.६ अंश, तर सोमवारी ७.८ अंश सेल्सिअस होते.‎ त्यानंतर मंगळवारी तापमानाचा पारा ७.८ अंश होता.‎ डिसेंबरपेक्षा जानेवारी थंडी वाढली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...