आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात घसरण:किमान तापमान 8 अंशांवर स्थिर‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पुन्हा वातावरणात बदल‎ होऊन तापमानाचा पारा घसरला‎ आहे. किमान तापमानाचा पारा‎ घसरून १० अंशांखाली तापमान‎ आले आहे. दोन दिवसांपासून‎ किमान तापमानाचा पारा ८ अंशांवर‎ स्थिरावला आहे.‎ शहरात काही दिवसांपासून‎ किमान व कमाल तापमानात वाढ‎ झाली होती. कमाल तापमान ३०‎ अंशांच्या पुढे नोंद करण्यात आली‎ आहे. त्याचप्रमाणे किमान‎ तापमानही वाढून १३ अंश‎ सेल्सिअसपर्यंत नोंद करण्यात‎ आली आहे. दिवसा उन्ह जाणवत‎ होते. थंडीही ओसरली असल्याने‎ वातावरणातील गारठाही कमी‎ झालेला होता.

दिवसा चांगलेच उन्ह‎ बाहेर फिरताना जाणवत होते. तर‎ रात्रीचाही गारठा कमी झालेला‎ होता. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा‎ वातावरणात बदल होऊन रात्रीच्या‎ वेळी गारठा वाढलेला आहे.‎ दिवसाही काही अंशी ढगाळ‎ वातावरण होते. तापमानातील या‎ बदलामुळे दिवसाही काही प्रमाणात‎ गारवा होता. रात्रीचे किमान तापमान‎ १० अंशांच्या खाली येऊन ८ अंश‎ सेल्सिअस तापमानाची नोंद कृषी‎ महाविद्यालयात केली आहे. दोन‎ दिवसांपासून रात्रीच्या वेळी गारवा‎ वाढला आहे. हवामान विभागाने‎ वर्तवलेल्या अंदाजानुसार तापमानात‎ घसरण होऊन गारवा जाणवत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...