आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:एमआयडीसीच्या ‘उद्योगावर’ मंत्री सामंत चिडले; कार्यालयाला १० कोटी

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे जिल्ह्याला लागून तीन राज्यांच्या सीमा आहेत. सात महामार्ग जिल्ह्यातून जातात. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी प्रयत्न होतील. अवधान औद्याेगिक वसाहतीत फायर स्टेशन केले जाईल. पिंपळनेर येथे साडेचारशे ते पाचशे एकर जमिनीवर नवीन एमआयडीसी करू. पिंपळनेर परिसरात भाजीपाला उत्पादन होते. या पार्श्वभूमीवर तेथे व्हेजिटेबल पार्कसाठी प्रयत्न होतील, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. बारा वर्षांपासून धुळे एमआयडीसीचे विभागीय कार्यालय स्वत:च्या इमारतीत नाही. हे कार्यालय विश्रामगृहात आहे.

याविषयी अधिकाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, आमदार मंजुळा गावित, आमदार फारुख शाह, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी अनिल गावित, उद्योजक नितीन बंग, राजेश गिंदाेडिया उपस्थित हाेते.

रावेर एमआयडीसीसाठी गणेशोत्सवानंतर बैठक
अवधान एमआयडीसीच्या विस्तारासाठी रावेर शिवारात भूसंपादनाचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पण या भागात वनविभागाची जमीन आहे. नरडाणा येथील काही जागा वनविभागाने परत मागितली आहे. यासह उद्याेजकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी गणेशोत्सवानंतर मंत्रालयात बैठक घेऊ असे मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अधिकारी फक्त प्रस्ताव पाठवण्याचे काम करता का?
एमआयडीसी कार्यालयाकडे कामाविषयी विचारणा केल्यावर प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अधिकारी फक्त प्रस्ताव पाठण्याचे काम करतात का?, एमआयडीसीच्या कार्यालयासाठी प्रस्ताव द्यावा. दहा काेटी मंजूर करताे. काेणत्याही परिस्थितीत विभागीय कार्यालयाची इमारत झाली पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले.

डीएमआयसी विषयी माहितीसह आढावा घेणार
एमआयडीसीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य माेबदला मिळावा यासाठी प्रयत्न आहे. प्रकल्प जाहीर झाल्यावर काही जण शेतकऱ्यांकडून जमिनी घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा हाेत नाही. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना निधी मिळेल यासाठी कायदा करू.डीएमआयसीविषयी आढावा घेऊन बाेलेन असेही मंत्री सामंत म्हणाले.

अवधान एमआयडीसीत फायर स्टेशन होणार, वाहनाचा प्रस्ताव पाठवावा
उद्याेगमंत्री उदय सामंत शनिवारी जिल्हा दाैऱ्यावर हाेते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात एमआयडीसीतील अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. बैठकीत खान्देश चेंबर आॅफ फाॅमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी अवधान एमआयडीसीतील फायर स्टेशन उभारण्याची मागणी केली. या वेळी मंत्री सामंत यांनी अवधान एमआयडीसीत तत्काळ फायर स्टेशन मंजूर करण्यासह या स्टेशनसाठी अत्याधुनिक वाहन घेण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, अशी सूचना केली.

१२ काेटींच्या पाणी याेजनेचा प्रस्ताव करावा
साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात साडेचारशे एकर जमीन शासनाची आहे. ती ताब्यात घेऊन याठिकाणी नवीन एमआयडीसी करू. या भागात भविष्यात व्हेजिटेबल पार्क होईल. पिंपळनेर एमआयडीसीच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. एमआयडीसीची ४२ काेटींची पाणीपुरवठा याेजना नाकारली असली तरी पर्यायी १२ काेटींच्या पाणी याेजनेचा प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...