आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशन:अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी असोसिएशन; सय्यद अतहर अली यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

शहादा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे अली एज्युकेशन सोसायटी, शहादा आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी असोसिएशन, नंदुरबार जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील खेतियारोड स्थित अक्सा पार्क येथे सय्यद अतहर अली कमर अली यांनी लिहिलेली व संकलन केलेल्या “गुलशन हजरत इमाम बादशाह’आणि “अक्से मोअल्लीम’या दोन पुस्तकांचे प्रकाशन उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर सय्यद अहमद खान एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.सय्यद लियाकत अली होते. तर जळगाव येथील इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार डॉ.काझी रफिकोद्दीन यांच्या हस्ते झाले. डॉ.अब्दुल करीम सालार यांनी “अवलिया किराम’ यांचे जीवन चरित्र तसेच त्यांचे उपदेश, समाजासाठी काम, दिलेले संदेश व जीवन यावर विचार व्यक्त केले. पुस्तकांचे लेखक अतहर अली यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.लियाकत अली यांनी, मुस्लिम मुलींच्या शिक्षणातील वाढता आलेख ही आनंदाची बातमी असल्याचे मत व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...