आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वच्छता वाढली:आमदारांनी दाखवले कचऱ्याचे ढिगारे ; स्वच्छतेवर लक्ष देण्याचा दिला सल्ला

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आराेग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात विविध ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार फारूख शाह यांनी आयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह शहरातील विविध भागात पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना कचऱ्याचे ढिगारे व अस्वच्छतेचे दर्शन घडवले. प्रशासनाने स्वच्छतकडे लक्ष द्यावे, अशी सूचना आमदार फारूख शाह यांनी अधिकाऱ्यांना केली.

शहरात काही भागात कचरा जमा झाला आहे. कर्मचाऱ्यांअभावी व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे मलेरिया, डेंग्यू, टायफाॅइडचे रूग्ण आढळत आहे. त्यानंतरही महानगरपालिकेचे दुर्लक्ष होते आहे. याविषयी शहरातील विविध भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आमदार शाह यांनी आयुक्त देविदास टेकाळे व अन्य अधिकाऱ्यांसह शहरातील ऐंशी फुटी रोड, मौलवीगंज, पाचकंदील, शंभर फुटी रोड, वडजाई रोड भागात पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना कचऱ्याचे ढिगारे दाखवले. आमदार फारुख शाह यांनी शहराच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. ज्या ठिकाणी कचराकुंडी नसेल तेथे ती ठेवावी, अशी सूचना त्यांनी केली. या वेळी उपायुक्त संगीता नांदुरकर, शहर अभियंता कैलास शिंदे, आरोग्य अधिकारी वसावे, राजू माईनकर, परवेज शाह, सउद सरदार, आसिफ शाह, रफिक शाह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...