आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:हलगर्जीपणामुळे आमदारांचा वीज कंपनीतील अधिकाऱ्यांना घेराव; अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन

धुळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोंगळ कारभारामुळे आमदार फारुख शाह यांनी वीज कंपनीच्या कार्यालयात सोमवारी आंदोलन करत अभियंत्यांना घेराव घातला. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. या वेळी अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले.

पावसामुळे काही भागातील वीजपुरवठा शनिवार व रविवारी खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. काही ठिकाणी २४ तासांपेक्षा अधिक वीजपुरवठा खंडित होता. तक्रार करण्यासाठी वीज कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधल्यावर अधिकारी माहिती देत नाही अशी तक्रार नागरिकांनी आमदार शाह यांच्याकडे केली. त्यामुळे आमदार फारुख शाह सोमवारी थेट वीज कंपनीच्या कार्यालयात आले. त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. जे अधिकारी, कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतात त्यांना निलंबित करा, अशी मागणी केली. अधिकाऱ्यांनी दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आमदारांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनाने तणाव निर्माण झाला हाेता.

बातम्या आणखी आहेत...