आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र‎:मुख्यमंत्री अन् राज्यपालांच्या हस्ते‎ ‘मनरेगा’चे अधिकारी सन्मानित‎

धडगाव‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मनरेगा अंतर्गत‎ अक्कलकुवा तालुक्यात सर्वाधिक‎ अंगणवाड्यांचे बांधकाम केल्याने‎ मुंबई येथील सभागृहात आयोजित‎ कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस व‎ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या‎ हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र‎ देऊन उपमुख्य कार्यकारी‎ अधिकारी (मनरेगा ) नंदकिशोर‎ सूर्यवंशी, गटविकास अधिकारी‎ महेश पोतदार, सहाय्यक प्रकल्प‎ अधिकारी जगदीश नाईक, तांत्रिक‎ सहाय्यक अतुल चौधरी, महेश‎ नेरकर यांचा सत्कार केला. .‎ नंदुरबार जिल्ह्यातील‎ अक्कलकुवा तालुक्यात सन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ २०२०-२१ पासून सुरू असलेल्या‎ मनरेगा अंतर्गत अंगणवाड्यांचे‎ बांधकाम राज्यात सर्वाधिक‎ अक्कलकुवा तालुक्याने केले‎ आहे.

उपमुख्य कार्यकारी‎ अधिकारी मनरेगा नंदकिशोर‎ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली‎ प्रभारी गटविकास अधिकारी महेश‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पोतदार, सहाय्यक प्रकल्प‎ अधिकारी जगदीश नाईक, तांत्रिक‎ सहाय्यक अतुल चौधरी, महेश‎ नेरकर यांनी परिश्रम घेत पूर्ण‎ केल्याने मुंबई येथील यशवंतराव‎ चव्हाण सभागृहात आयोजित‎ कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...