आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​दिव्य मराठी विशेष:ई-पीकसाठी मोबाइल ॲप व्हर्जन-२; प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश केला समाविष्ट

धुळे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने पीक पाहणी नोंदणी करिता ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे. मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमध्ये बदल केले आहे. त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाइल ॲप व्हर्जन- २ विकसित केले आहे.

राज्य शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यात लागू केला आहे. खरीप हंगाम २०२२ची ई-पीक पाहणी मोबाइल अॅपद्वारे नोंदणी १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली. शेतकऱ्यांनी मोबाइल अॅपद्वारे पीक पाहणी नोंदवल्यापासून ४८ तासांत स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येणार आहे. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत पिकाच्या विक्रीसाठी संमती नोंदवण्याची सुविधादेखील या अॅपमध्ये आहे. सुधारित अॅपमध्ये प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट केले आहे. शेतकरी ज्या वेळी पीक पाहणी करताना पिकांचे फोटो घेतील, त्या वेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीत दिसणार आहे. पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश ॲपमध्ये दर्शवण्यात येणार आहे. अचूक फोटो घेतला किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.

शेतकऱ्यांना होणार मदत
ई-पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा व पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करण्यासाठी फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीपैकी किमान १०% तपासणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच्या मोबाइल अॅपमध्ये मुख्य केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के पीक व दोन दुय्यम पिके नोंदवण्याची नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे याची शेतकऱ्यांना मदतच होणार आहे.

सर्व गावांसाठी सुविधा
ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमध्ये त्या गावातील खातेदारांनी पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीत दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी यांच्याकडे अर्ज करणे शक्य होणार आहे. ई-पीक पाहणी व्हर्जन -२ मधील नवीन सुधारणा राज्यात राबवण्यात येत आहे. या अधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे एक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिके वर्ष पूर्ण होत आहे. ई-पीक पाहणी नोंदवण्यावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...