आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:माेबाइल टाॅवर कारवाईचा फटका‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध भागात मोबाइल‎ टॉवर उभारण्यात आले आहे. टाॅवर‎ कंपन्यांनी मालमत्ता कर न भरल्याने‎ मनपाने टाॅवर सील केले. अनेक‎ भागात मोबाइलला रेंज मिळत‎ नसल्याने नागरिकांची गैरसोय होते‎ आहे. गेल्या आठ दिवसांपासून पेठ‎ विभागातील सर्व व्यापारी‎ प्रतिष्ठानचे व्यवहार विस्कळीत‎ झाले आहे. त्यामुळे याविषयाकडे‎ लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेनेने‎ केली आहे.‎ मनपाने मोबाइल टॉवर सील‎ केल्याने पेठ भागातील नागरिक‎ व्यापारी, डॉक्टरांनी शिवसेनेचे‎ उपमहानगरप्रमुख कैलास मराठे‎ यांच्याकडे तक्रार केली होती.‎

त्यानुसार शिवसेनेच्या‎ पदाधिकाऱ्यांनी मोबाइल कंपनीच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अधिकाऱ्यांना निवेदन दिले.‎ निवेदनात म्हटले आहे की, पेठ‎ भागातील गल्ली क्रमांक ४, ५, ६ या‎ भागात राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी‎ प्रतिष्ठान, मेडीसीन मार्केट,‎ हाॅस्पिटल आहे. या सर्व प्रतिष्ठानाचे‎ व्यवहार ऑनलाइन असून सर्वांचे‎ व्यवहार आठ दिवसांपासून ठप्प‎ आहे.

त्यामुळे याविषयाकडे लक्ष‎ द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करण्यात आली. या वेळी भटू शेठे,‎ सागर भडागे, राहुल धात्रक, दिलीप‎ जगताप, बाॅबी शेख, सोमेश‎ कानकाटे, राज चव्हाण, प्रितम‎ लोखंडे, अजिज शेख, शंतनु‎ लोखंडे, ऋषिकेश मराठे आदी‎ उपस्थित होते. त्यामुळे मोबाइल‎ कंपन्यांनी तातडीने उपाययोजना‎ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे‎ करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...