आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:नरडाण्यात मिळाला मोदक; रांगोळी स्पर्धेला प्रतिसाद

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील डी. बी. सिसोदे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त सत्यजित सिसोदे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी मोदक व रांगोळी स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन सत्यजित सिसोदे व प्रेरणा सिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत ७० स्पर्धक सहभागी झाले होते.

मोदक स्पर्धेत प्रथम क्रमांक शीतल जगताप, द्वितीय क्रमांक शारदा पाटील, तृतीय क्रमांक रोहिणी पाटील, उत्तेजनार्थ शिल्पा पाटील यांनी मिळवला. रांगोळी स्पर्धेचे प्रथम क्रमांक सुशीला बागूल, द्वितीय क्रमांक धनश्री पवार, तृतीय क्रमांक सीमा सिसोदे, उत्तेजनार्थ राजश्री पाटील यांनी मिळवला. विकास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अविनाश कोतकर, इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या जयश्री पवार, कलाशिक्षक आर. व्ही. भामरे, छाया पाटील आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन कल्पना भामरे, सारिका नेरकर, त्रिवेणी व्यास, नेहा पोटे, वर्षा सयाजी, सीमा ठाकरे, प्रतीक्षा कोतकर, प्रतिभा चौधरी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...