आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:वीज कर्मचाऱ्यांशी मोगलाई; मारहाण केल्याने गुन्हा दाखल

धुळे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मोगलाई परिसरात थकीत वीज बिल वसुली व वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या पथकाला दमदाटी करण्यात आली. तसेच मारहाण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. वीज कंपनीचे पथक थकीत वीज बील वसुलीसाठी गेले होते. सहा. अभियंता लोकेश चव्हाण, विजयसिंग राजपूत, गणेश सूर्यवंशी, सुकलाल भील यांच्यासह १२ कंत्राटी कर्मचारी होते.

मोगलाईमधील टि व्ही सेंटर जवळ असलेल्या ड्रायव्हर गल्लीत त्यांना अडवले. यावेळी वरिष्ट तंत्रज्ञ मनोज यशवंत पवार ( वय ३४ ) व इतरांना साजिद खान, त्याचा भाऊ, अजिम दादा व एक २० ते ३० वर्षाच्या तरुणाने मारहाण केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेचा कर्मचारी सागर सोनार याने मोबाईलमध्ये शुटींग केल्यामूळे त्याला ही दमदाटी करत मोबाईल हिसकवला. शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...