आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन:सावकार बंब कारागृहात रवाना; बुधवारी पुन्हा पोलिस अटक

धुळे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध सावकारी प्रकरणी १४ दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या राजेंद्र बंबला मंगळवारी न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानंतर आझादनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये त्यांना ट्रान्स्फर करावे, असा अर्ज पोलिसांनी न्यायालयात दिला. त्याला न्यायालयाने परवानगी दिली. त्यामुळे मंगळवारची रात्र बंबने कारागृहात काढली. बंबला बुधवारी पुन्हा पोलिस अटक करतील.

राजेंद्र बंबच्या विरोधात जयेश दुसानेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. तो आर्थिक गुन्हे शाखेत वर्ग झाला आहे. याच गुन्ह्यात बंबला अटक झाली होती. नियमानुसार संशयित आरोपीला १४ दिवसांपर्यंत पोलिस कोठडीत ठेवता येते. ही मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर बंबला न्यायालयात उभे केले. न्या. ए. डी. क्षीरसागर यांच्या समक्ष कामकाज झाले. त्यानंतर राजेंद्र बंब याच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश देण्यात आले. दरम्यानच्या काळात राजेंंद्र बंब विरुद्ध तीन गुन्हे दाखल झाले आहे. त्यापैकी आझादनगर पोलिस ठाण्यात दोन व शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी राजेंद्र बंबला ताब्यात द्यावे, असा विनंती अर्ज आझादनगर पोलिसांनी दिला आहे. त्यानुसार सकाळी बंबला ताब्यात घेणार असल्याचे आझादनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आनंद कोकरे यांनी सांगितले.

आज पुन्हा कामकाज
इतर तीन गुन्ह्यांमध्ये अटक करू नये यासाठी राजेंद्र बंबतर्फे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल झाला आहे. त्यावर उद्या बुधवारी कामकाज होईल.

बातम्या आणखी आहेत...