आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात काही दिवसांपासून पाऊस होतो आहे. त्यामुळे वातावरण बदलल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या असून, सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या खासगी रुग्णालयात वाढते आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती व उपद्रव वाढला आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर जून महिन्यात वातावरणात अचानक बदल झाला. त्यानंतर जुलैत जोरदार पाऊस झाल्याने गारठा वाढला आहे. काही दिवसांपासून सूर्यदर्शनही झालेले नाही. वातावरणात झालेला हा बदल आरोग्यासाठी त्रासदायक ठरतो आहे. पावसाचे पाणी अनेक ठिकाणी साचल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. मलेरियासदृश आजाराचे लक्षणे जाणवणारे रुग्ण वाढले आहे. खासगी दवाखान्यात अंगदुखी, ताप, खोकला, कफ आदी लक्षणांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. व्हायरल इनफेक्शनचे रुग्ण जास्त असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. डासांची उत्पत्ती वाढल्याने महापालिका प्रशासनाने नियमित फवारणी करण्याची आवश्यकता व्यक्त हाेते आहे.
अशी घ्या काळजी अन् रहा ठणठणीत {जास्त थंड पाणी आणि कोल्ड्रिंकचा मोह टाळा. { हलका व पौष्टिक आहार घ्या. { पालक, मुळा, कांदे व लसूण खाणे टाळावे. { सुका मेवा कमी प्रमाणात खावा. { जेवणात फळे, सलाड व ज्यूस घ्या. { उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे. { सर्दी होऊ नये म्हणून चहामध्ये अद्रकचा वापर करा.
फवारणीसाठी 52 कर्मचारी नियुक्त
डास निर्मूलनासाठी मनपाने कंत्राटी पद्धतीने २० कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांच्यासह मनपातील दहा सफाई कर्मचारी व मलेरिया भागातील २२ अशा एकूण ५२ कर्मचाऱ्यांच्या मदतीने फवारणी केली जाते आहे. कामाच्या सोयीसाठी शहराचे ९ भाग केले आहे. महापालिकेचे ९ वरिष्ठ क्षेत्र कर्मचारी असून प्रत्येकाच्या हाताखाली ३ कर्मचारी फवारणीचे काम करत आहे.
गेल्यावर्षी जुलैत डेग्यूचे २२ रुग्ण
शहरात मलेरियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पण डेंग्यूचे केवळ दोन संशयित रुग्ण आढळले आहे. दुसरीकडे गेल्यावर्षी जुलै महिन्यात डेंग्यूचे २२ पॉझिटिव्ह तर ८२ संशयित रुग्ण आढळून आले होते. दरम्यान, जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीत रोज तीनशेहून जास्त रुग्ण येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.