आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:तीन हजारांवर परीक्षार्थी एमपीएससी परीक्षा देणार

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट- क संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी (दि.५) होणार आहे. परीक्षेसाठी ३ हजार ४८ परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहे. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मनाई आदेश लागू केले आहे.

शहरातील कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल, जे.आर. सिटी हायस्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कुल, जिजामाता कन्या विद्यालय, न्यु.सिटी हायस्कूल, कनोसा काॅन्व्हेंट हायस्कूल, जयहिंद हायस्कूल अशा ७ उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात शनिवारी (दि.५) सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत परीक्षेशी संबंधित नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेश नसेल. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने बंद असतील.

बातम्या आणखी आहेत...