आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार विहिरीत कोसळून चौघे ठार:आईसह दोन मुलांचा बुडून मृत्यू​​​​​​​; धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात भीषण दुर्घटना

सटाणा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत गाैरी (35), मुलगा तन्मय (12), मुलगी श्रद्धा बोरसे (15). - Divya Marathi
मृत गाैरी (35), मुलगा तन्मय (12), मुलगी श्रद्धा बोरसे (15).
  • शंकर बोरसे पत्नी, मुलगा, मुलीसह कारने दुसाने (ता. साक्री) येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते.

साक्री तालुक्यातील दिघावे गावाजवळ धावती कार विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात आई, मुलगा-मुलीसह चौघांचा मृत्यू झाला. गौरी शंकर बोरसे (३५), त्यांचा मुलगा तन्मय (१२) , मुलगी श्रद्धा बोरसे (१५) व भूमी योगेश पानपाटील (१२) अशी मृतांची नावे आहेत. कार चालवत असलेले शंकर बोरसे यांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. शंकर बोरसे पत्नी, मुलगा, मुलीसह कारने दुसाने (ता. साक्री) येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाह आटोपून ते दिघावे येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी जात असताना कासारे-गणेशपूर रस्त्यालगत असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने कार विहिरीत कोसळली.

या अपघातात तिन्ही लहान मुलांसह महिलेचा मृत्यू झाला. चालक शंकर बोरसे यांना वाचवण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले. आई व मुलाचा मृतदेह सापडला. परंतु, दोन मुलींच्या मृतदेहांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. विहिरीत गाळ असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या.

बातम्या आणखी आहेत...