आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन आत्महत्या:पाच वर्षीय मुलाचा गळा आवळून आईची आत्महत्या

अमळनेर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वतःच्या पाच वर्षांच्या मुलाचा दोरीने गळा आवळून एका ३२ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.१७) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील शिरुड येथे उघडकीस आली. सासरच्या मंडळींशी असलेल्या वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून ती माहेरी वास्तव करत होती. या तणावातून तिने मुलासह आत्महत्या केल्याची प्राथमिक समोर आली आहे. पूर्वी दीपक पाटील (सोनवणे) असे त्या विवाहितेचे तर ऋशांत उर्फ बिट्टू असे त्या मुलाचे नाव आहे.

शिरूड येथील वसंत पाटील यांची मुलगी पूर्वी हिचा नंदुरबार येथील दीपक पाटील यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना पाच वर्षांचा ऋशांत नावाचा मुलगा होता. सासरच्या मंडळींशी झालेल्या वादामुळे पूर्वी ही माहेरी शिरुड येथे राहत होती. पूर्वी तिसऱ्या मजल्यावर पूर्वी झोपत असे. ऋशांत आजी-आजोबांसोबत झोपत हाेता. मात्र, गुरुवारी रात्री पूर्वीने त्याला सोबत नेले. शुक्रवारी सकाळी ऋशांतचा आवाज आला नाही म्हणून आजी सुरेखा पाटील त्याला पाहण्यासाठी गेल्या असता त्यांना तो पलंगावर मृतावस्थेत दिसला तर पूर्वी हिने देखील छताला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसले. पोलिस पाटील विश्वास महाजन यांच्या फिर्यादीवरून अमळनेर ठाण्यात पूर्वी पाटील यांच्या विरोधात मुलाची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...