आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:लग्नाला जाताना जावयासह सासू ठार; अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील घटना

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वणी शिवारात भरधाव वेगातील कार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलवर आदळली. या अपघातात जावयासह लग्नकार्याला जाणारी सासू ठार झाली. मधुकर पाटील व लीलाबाई पाटील असे मृतांचे नाव आहे. हा अपघात बुधवारी सकाळी झाला.

वडजाई-सौंदाणे येथील लीलाबाई दगडू पाटील (वय ६२) यांच्या नातलगाचे अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथे लग्नकार्य होते. त्यासाठी सुरत येथे राहणारे त्यांचे जावई मधुकर यशवंत पाटील (वय ३८) हे आले होते. बुधवारी सकाळी दोघेही मोटारसायकलने (जीजे-०५-केयु-१६७७) मंगरुळकडे जाण्यास निघाले. फागणे गाव सोडल्यानंतर मोटारसायकल अमळनेर फाट्याकडे वळाली. त्याचवेळी कार (एमपी-०९-डब्ल्यूसी-२२२९) भरधाव वेगाने निघाली होती. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला धडक दिली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नवनाथ महाराज मंदिराजवळ हा अपघात झाला. त्यानंतर दोघा जखमींना हिरे रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू करण्यापूर्वी मधुकर पाटील यांचा मृत्यू झाला होता. काही वेळानंतर लीलाबाई पाटील यांचाही मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...