आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:तापी नदीपात्रात आईने मुलासह घेतली उडी; वहीवरून ओळख पटली

शिरपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावा जवळ तापी नदीवर असलेल्या पुलावरून अंदाजे ३० वर्षीय महिलेने १० वर्षांच्या मुलासह नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. योगिताबाई रवींद्रसिंग गिरासे (वय ३०) व तेजेंद्र रवींद्रसिंग राजपूत (वय १० रा. वाडी ता.शिरपूर) आई-मुलाचे नाव आहे.

शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील माहेर असलेल्या योगिताबाई राजपूत दहा वर्षाच्या मुलासह डोंगरगाव येथून गुरुवारी सासरीवाडी येथे येण्यासाठी निघाल्या होत्या. पण वाडी येथे न जाता त्या थेट गिधाडे येथील तापी नदीवर असलेल्या पुलावर आल्या. तेथून त्यांनी नदी पात्रात उडी घेतल्याचे त्यांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले. पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी दोघांना नदीपात्रात उडी घेताना बघितले. घटनास्थळी बॅग, चपला व वह्या मिळून आल्या. वहीवरील नाव व फोननंबर वरून योगिताबाई यांची ओळख पटवण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...