आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:नवजात बालिकेसह‎ मातांचा केला सत्कार‎

धुळे‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कै. साै. सुनंदाताई केले‎ महिला पतसंस्थेतर्फे जागतिक‎ महिला दिनी जन्माला अालेल्या‎ कन्या व त्यांच्या मातांचा सत्कार‎ करण्यात आला. दरवर्षी‎ पतसंस्थेतर्फे हा उपक्रम राबवला‎ जाताे. या वेळी महापालिका अाणि‎ शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या‎ कन्यांना चिल्ड्रन किट देण्यात आले.‎ या उपक्रमांतर्गत जागृती दीपक‎ भील, ललित प्रदीप भील, रितू‎ स्वप्निल पाटील, फरजाना बानाे‎ फैसल अन्सारी, नयना साेपान‎ वाणी, वैशाली किशाेर गवळी,‎ आयशाबानाे अन्सारी, सरला‎ शिवाजी भील आदींना साडीचोळी‎ देण्यात आली.

तसेच त्यांचा सत्कार‎ करण्यात आला. पतसंस्थेच्या‎ उपसभापती कल्पना सतीश‎ बाविस्कर, सुनंदा गाेपाळ केले,‎ महानंदा नारायण चव्हाण, चित्रा‎ राजेंद्र चिताेडकर, वैशाली जितेंद्र‎ साेनगीरे, मीनाक्षी श्यामकांत‎ काेतकर, सुनंदा मनाेहर भाेकरे,‎ मीनाक्षी सुनील देशमुख, उषा‎ तुळशीराम साेनवणे आदी उपस्थित‎ होत्या. सामाजिक बांधिलकीतून हा‎ उपक्रम राबवण्यात आला.‎‎

बातम्या आणखी आहेत...