आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:बहुजनांसह मराठा सेवा संघाची चळवळ

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा सेवा संघ ३३ कक्षाच्या माध्यमातून भारतासह अन्य देशात कार्यरत आहे. बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांसह बहुजन समाजाला सोबत घेऊन संघाचे काम सुरू आहे. मराठा सेवा संघाने इतिहासातील विकृतीवर प्रहार केल्याचे प्रतिपादन डॉ. प्रा. सदाशिव सूर्यवंशी यांनी केले.

मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या कार्यालयात त्यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत हाेते. महापालिकेचे सहायक आयुक्त विजय सनेर अध्यक्षस्थानी हाेते. या वेळी संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, डॉ.संजय पाटील, साहेबराव देसाई, प्रकाश पाटील, चंद्रकांत देसले, प्रा. टी. पी. शिंदे, लहू पाटील, कार्याध्यक्ष मोहन देसले, डॉ. सुलभा कुवर, नूतन पाटील, प्रा. वैशाली पाटील, निंबा मराठे आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, मराठा सेवा संघाने अधिवेशनाच्या माध्यमातून विविध ठराव केले.

त्यात शिवजयंती तारीख निश्चिती, स्वच्छ भारत अभियान, इंग्रजी माध्यमातून शिक्षण, सामुदायिक विवाह चळवळ आदींचा समावेश आहे. अनिष्ट प्रथा व देश तथा समाजाच्या प्रगतीला अडथळा बनू पाहणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार करत शिवधर्म सारख्या नव्या संकल्पनेतून समाज हित जोपासले. शेतकरी आत्महत्या थांबवण्यावर उपाय सुचवले. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाज परिवर्तन शक्य असल्याची जाणीव करून दिली. समाजातील चुकीच्या समजुती दूर करणे आवश्यक आहे. युवा पिढीसह सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करावे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय पाटील, नितीन पाटील, नितीन भदाणे, रामकृष्ण पाटील, मिलन पाटील, मनोज पाटील, पी.सी.पाटील, संभाजी चव्हाण, गोकुळ पाटील, आनंद पवार, ज्ञानेश्वर पाटील, विजय ढोबळे, अशोक तोटे, वीरेंद्र मोरे, अमर फरताडे, उमेश शिंदे, एच. ओ. पाटील आदींनी प्रयत्न केले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
या वेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे विजय सनेर, एस. एम. पाटील, आर. एन. पाटील, सुलभा कुंवर, वैशाली पाटील, प्रा. डॉ संजय पाटील, नवीनचंद्र भदाणे, साहेबराव देसाई, टी.पी. शिंदे, व्ही.के. भदाणे यांचा सत्कार करण्यात आला. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. एस.एम. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी ए पाटील यांनी आभार व्यक्त मानले.

बातम्या आणखी आहेत...