आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:श्री साईसेवा होमिओपॅथिक क्लिनिक; नवापुरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून शिबिरात रुग्णांवर मोफत उपचार अन‌् मार्गदर्शन

नवापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री साईसेवा होमिओपॅथिक क्लिनिक व के.एच. न्युरॉन हॉस्पिटल, सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर डॉ. आशुतोष वाडिले यांनी आयोजित केले होते. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन धन्वंतरी मूर्तीचे पूजन करून नगराध्यक्षा हेमलता पाटील, भाजप तालुकाध्यक्ष भरत गावित, डॉ.नचिकेत नाईक, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नगरसेवक महेंद्र दुसाने, तालुका आरोग्याधिकारी डॉ.मनीषा वळवी, नवापूर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विशाल वळवी, डॉ.प्रमोद वळवी, गुलाबचंद वाडिले, गोपाल पवार, ईश्वर वाडिले यांच्या हस्ते झाले.

मेंदू व मणका यातील आजाराबाबत हरीन मोदी यांनी उपचार करून अपघातग्रस्तांना त्यांनी वेळीच उपचार करून घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अनेक रुग्णांना नाक-कान-घसा याबाबत मार्गदर्शन केले. तालुकाध्यक्ष भरत गावित, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी डॉ.हरीन मोदी, डॉ.प्रयत्न कुमार, डॉ.विशाल चौधरी, डॉ.शीतल कुलकर्णी, डॉ.श्रेयस चौधरी, डॉ.विधी गुप्ता, डॉ.अमित मावची, डॉ.अजय कुंवर, डॉ.राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.