आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विसर्जनाचा सायंकाळी सहापर्यंत मुहूर्त शुभ; भक्तांनी विसर्जनावेळी पुनरागमनायचं म्हणायला विसरू नये

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा उद्या शुक्रवारी अनंत चतुर्दशीला समारोप होणार आहे. अनंत चतुर्दशीला सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्ती विसर्जन करण्यास हरकत नाही. मात्र, घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सायंकाळी सहा वाजेपूर्वीच करणे शुभ असल्याचे सांगण्यात आले. यंदा दोन वर्षांनंतर गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. आता हा उत्सव शेवटच्या टप्पयात आला आहे. गणेश मंडळांनी उद्या शुक्रवारी होणाऱ्या विसर्जन सोहळ्याची तयारी सुरू केली आहे. यंदा बहुतांश मंडळांतर्फे बाप्पाला वाजत-गाजत निरोप देण्यात येणार आहे.

यंदा मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा हटवल्याने अनेक मंडळाकडून माेठ्या आकाराच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. अनेकांनी यंदा शाडू मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना केली आहे. अनंत चतुर्दशीला सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन होईल. गणरायाच्या आगमनाप्रमाणे निरोपाचा सोहळाही महत्त्वाचा असतो. अनेक जण पुरोहितांना बोलावून उत्तरपूजा करतात. तसेच मुहूर्तावर गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास प्राधान्य देतात. गणेशमूर्तीचे विसर्जन सूर्योदयाच्या आत म्हणजे ६ वाजून ८ मिनिटापर्यंत करण्यास प्राधान्य द्यावे तोपर्यंत चांगला काळ आहे. मूर्तीचे विसर्जन करताना काळजी घ्यावी. मूर्ती खंडित होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे.

उशीर होणार असेल तर आरती करून मूर्ती हलवावी
अनंत चतुर्दशीला सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटापर्यंत विसर्जनाचा मुहूर्त आहे. घरगुती मूर्तींचे विसर्जन या काळात झाले पाहिजे. पण वेळेअभावी उशीर जरी झाला तरी सायंकाळी ६ वाजेच्या आत आरती करून मूर्ती जागेवरून थोडी हलवून ठेवावी. त्यामुळे मूर्तीतील देवत्व संपते. विसर्जनाच्या वेळी पुनरागमनायचं असे म्हणाला विसरू नये.
पंकज जोशी,पुरोहित

जलप्रदूषण टाळा
गणेशमूर्तींचे विसर्जन घरीच करणे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. घरात अथवा अंगणात बादली, टबमध्ये पाणी घ्यावे. त्याभाेवती आकर्षक रांगाेळी रेखाटावी व त्यानंतर या ठिकाणी मूर्तीचे विधिवत विसर्जन करावे. जेणेकरून विसर्जनानंतर मूर्तीची विटंबना हाेणार नाही आणि पर्यावरणाचे संवर्धन हाेईल. मूर्ती विसर्जनानंतर मातीयुक्त पाणी बागेतील झाडांना टाकल्यास गणराय नेहमीच असतील हे भक्तांनी लक्षात घ्यावे.

बातम्या आणखी आहेत...