आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:शास्ती माफीसाठी आता‎ मनपाने ठरवले तीन टप्पे‎

धुळे‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने पुन्हा ८ मार्चपासून थकीत‎ मालमत्ता करावरील शास्ती माफ‎ करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता‎ तीन टप्प्यात १०० ते २५ टक्के शास्ती माफ‎ होणार असल्याची माहिती देण्यात आली.‎ महापालिका प्रशासनाला सर्वाधिक‎ उत्पन्न मालमत्ता करातून प्राप्त होते.‎ शहरात मालमत्ता कर थकबाकीचे प्रमाण‎ जास्त आहे. मालमत्ता कर थकल्यावर‎ दरमहा २ टक्के शास्ती आकारली जाते.‎

करापेक्षा शास्तीची रक्कम जास्त होत‎ असल्याने अनेक जण कर भरण्यास‎ टाळाटाळ करतात. त्यामुळे महापालिका‎ मार्च महिन्यात शास्ती माफीची योजना‎ राबवत थकबाकीदारांना दिलासा देते.‎ त्यानुसार यंदा फेब्रुवारी महिन्यात मालमत्ता‎ कर भरणाऱ्यांची शास्ती शंभर टक्के माफ‎ करण्यात आली. या योजनेला चांगला‎ प्रतिसाद मिळाला.

त्यामुळे मार्च‎ महिन्यातही शास्ती माफ योजना राबवावी,‎ अशी मागणी महापौर प्रतिभा चौधरी यांनी‎ केली होती. त्यानुसार आयुक्त देविदास‎ टेकाळे यांनी आता पुन्हा शास्ती माफ‎ योजना जाहीर केली आहे. त्यानुसार ८ ते‎ २० मार्च दरम्यान कर भरणाऱ्यांना १००‎ टक्के, २१ ते २६ मार्चपर्यंत कर भरणाऱ्यांना‎ ५० टक्के व उर्वरित दिवसांत कर‎ भरणाऱ्यांना २५ टक्के शास्ती माफ होईल.‎

बातम्या आणखी आहेत...