आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:मनपा एलबीटी विवरण तपासणीसाठी सीए नेमणार

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलबीटीच्या विवरणपत्रांची तपासणी करण्यासाठी महापालिका पुन्हा नवीन सीएची नियुक्ती करणार आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी महापालिका हद्दीत एलबीटी वसूल केला जात होता. कालांतराने हा कर रद्द झाला. पण एलबीटीसाठी पात्र असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विवरण पत्रांची तपासणी सुरूच होती. त्यासाठी महापालिकेने सीए कंपनीची नियुक्ती केली होती.

या कंपनीविषयी तक्रारी झाल्या होत्या. तसेच संबंधित कंपनीची नियुक्ती केवळ सहा महिन्यांसाठी असताना या कंपनीने पाच वर्षांपासून विवरणपत्र तपासण्याचे काम सुरू ठेवले होते. व्यापाऱ्यांच्या तक्रारी वाढल्यावर कंपनीचे काम थांबवण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा नवीन सीए कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी अटी, शर्ती व निविदा तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध करून सीए कंपनीची नियुक्ती होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...