आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:महापालिकेला ५ हजार रोपे मिळणार मोफत

धुळे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात वृक्षारोपण अभियानाला प्रारंभ झाला आहे. त्यासाठी मनपा प्रशासनातर्फे नागरिकांना मोफत रोपे दिली जात आहे. रोप देण्यापूर्वी नागरिकांकडून रोपांचे संवर्धन करण्याचे हमीपत्र लिहून घेतले जाते आहे. मनपा प्रशासनाला वन विभागातर्फे ५ हजार रोपे मोफत मिळणार आहे.

महापालिका १ लाख रोप लावण्याचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यानुसार वृक्षारोपण सुरू झाले आहे. ज्यांनी महापालिकेतून रोपे घेतली त्यांच्यावर रोपांचे संवर्धन करण्याची जबाबदारी असेल. मनपाने पहिल्या टप्प्यात १ हजार रोप वन विभागाकडून घेतली होती. त्यापैकी ७०० रोपांचे वाटप झाले आहे. आता तीन ते चार फुटांची रोप वन विभागातर्फे पुढील आठवड्यात मनपाला मिळतील. त्यात निंब, चिंच, आवळा, बेहडा, गुलमोहर आदी रोपांचा समावेश असेल, अशी माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...