आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम पुन्हा ठप्प‎:महापालिकेची अतिक्रमण‎ निर्मूलन पुन्हा थंडावली‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य रस्त्यांवर‎ अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे‎ वारंवार वाहतूक कोंडी हाेते. ही‎ बाब लक्षात घेत महापालिकेने‎ काही दिवसांपूर्वी अतिक्रमण‎ निर्मूलन मोहीम सुरू केली हाेती.‎ पण आता ही मोहीम पुन्हा ठप्प‎ झाली आहे.‎ शहरातील अनेक रस्त्यांवर‎ खाद्यपदार्थांचे स्टॉल, फेरीवाल्यांनी‎ अतिक्रमण केले आहे. तसेच‎ संतोषी माता मंदिर परिसर,‎ महापालिका इमारतीचा परिसर,‎ देवपूर, पाचकंदील, साक्री रोड‎ आदी भागात रस्त्यावर फळ व‎ भाजी विक्रेते बसलेले असतात.‎

त्यामुळे या रस्त्यांवर वारंवार‎ वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे‎ महापालिकेने अतिक्रमण‎ काढण्याचा निर्णय घेतला. कारवाई‎ बारा पत्थरपासून मोहिमेला प्रारंभ‎ करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही‎ बाजूला पांढरे पट्टे मारण्यात येऊन‎ गॅरेज व्यावसायिकांना या रेषेच्या‎ पुढे येण्यास मनाई करण्यात आली.‎ पण काहीही उपयोग झाला नाही.‎ तसेच अतिक्रमण निर्मूलन मोहीम‎ ठप्प झाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...