आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन‎:फलक कारवाईचा ‘दुखवटा’‎ आंदाेलनातून मनपाचा निषेध‎

धुळे ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवजयंतीनिमित्त शहरातील चाैकात ‎लावलेले फलक महापालिकेकडून ‎काढण्यात आले आहे. या कारवाईच्या विराेधात शनिवारी शिवभक्त, शिवप्रेमी ‎ व सकल हिंदू समाजातर्फे महापालिका ‎प्रशासनाचा निषेध नाेंदवला. याच्या ‎ निषेधार्थ महापालिकेच्या प्रवेशद्वारासमाेर ‎ दुखवटा आंदाेलन करीत हा निषेध केला ‎ ‎ गेला. याप्रसंगी घाेषणाबाजीही करण्यात ‎ आली. आंदाेलनात प्रशासनाची ‎ प्रतीकात्मक तिरडीही ठेवली हाेती. ‎

या आंदाेलनात रणजित भाेसले, अतुल साेनवणे, अॅड. राेहित चांदाेडे, विशाल‎ जाधव, संजय साेनवणे, विक्की परदेशी,‎ माेहन टकले, पप्पू डापसे, जयेश मगर,‎ किरण अहिरे, निखिल माेमया, ललित‎ देवरे, तुषार नवले, संजय सांगळे, भूषण‎ सूर्यवंशी, गाैरव गिते, पंकज धात्रक‎ यांच्यासह शिवभक्त, शिवप्रेमी व हिंदू‎ नागरिकांनी आंदाेलनात सहभाग घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...