आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:आठवड्यात 100  गळत्या‎ रोखण्याचा मनपाचा फतवा‎

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ७० टक्के जलवाहिन्या जुन्या‎ झाल्याने त्यांना वारंवार गळती लागते. गळती‎ दुरुस्तीसाठी महापालिकेने आता तीन स्वतंत्र ठेकेदार‎ नेमले आहे. ठेकेदारांना आठवडाभरात १०० गळत्या‎ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शहरातील‎ बहुतांश जलवाहिन्या ३० ते ३५ वर्षांपूर्वीच्या आहे.‎ शहरात साधारणपणे ८०० किलोमीटरची जलवाहिनीचे‎ जाळे आहे.

त्यातील जवळपास ५०० किलोमीटर‎ जलवाहिनी जुनी आहे. त्यामुळे या जलवाहिन्यांना‎ गळती लागण्याचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर‎ महापालिकेने गळत्या काढण्यासाठी शहराचे तीन भाग‎ करुन स्वतंत्र तीन ठेकेदार नेमले आहे. आता चौथ्या‎ भागाचाही ठेका दिला जाणार आहे. ठेकेदारांना १००‎ गळत्या आठवडाभरात दुरुस्तीचे आदेश देण्यात आले‎ असून सोमवारी या कामाचा आढावा घेणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...