आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेतर्फे शहरात स्वच्छता अभियान राबवले जाते आहे. या अभियानात सन २०२० व २०२१ मध्ये मनपाची कामगिरी चांगली होती. देशात मनपा नवव्या क्रमांकावर होती. या कामगिरीत महापालिकेला सातत्य राखता आले नसल्याची स्थिती आहे. सद्य:स्थितीत मनपा देशात ५०व्या क्रमांकावर आहे. एकीकडे ही स्थिती असून दुसरीकडे महापालिका इमारतीतील बहुतांश भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कठोर धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या आवारात गुटखा, तंबाखूचे सेवन करताना व थुंकताना आढळल्यास जागेवरच एक हजार रुपये दंड होईल.
शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते आहे. स्वच्छता अभियानांतर्गत वेेगवेगळे निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो आहे. दुसरीकडे महापालिका इमारतीच्या भिंती मात्र गुटखा, पान, तंबाखूचे सेवन करणाऱ्यांनी रंगवल्या आहे. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. इमारतीच्या आवारातील पार्किंगची जागा, जिने, गॅलरीच्या भिंती लालबुंद झाल्या आहे. मनपा आवारात धूम्रपान करण्यास मनाई असून हा नियम कुणीही पाळत नाही.
दुसरीकडे महापालिकेची स्वच्छता अभियानात यापूर्वी चांगली कामगिरी होती. ती आता खालावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता मनपा स्वत:च्या इमारतीपासूनच स्वच्छता राखणार आहे. महापालिका आवारात धूम्रपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. त्यानुसार गुटखा, तंबाखू खातांना आढळणाऱ्यांना जागेवर एक हजार रुपये दंड केला जाणार आहे.
माझी वसुंधरा अभियानासाठी कृती आराखडा तयार करणार
माझी वसुंधरा अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. अभियान राबवण्यासाठी कृती आराखडा केला जणार आहे. या पार्श्वभूमीवर उपायुक्त विजय सनेर यांच्या उपस्थितीत विभाग प्रमुखांची बैठक झाली. बैठकीत अभियानाची पार्श्वभूमी मुख्य स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी स्पष्ट केली.
नगरसचिव मनोज वाघ, कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माईनकर, विद्युत अभियंता एन. के. बागूल, नगररचना अभियंता कमलेश सोनवणे, प्रकाश सोनवणे, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, मलेरिया विभागप्रमुख विकास साळवे, स्वच्छता निरीक्षक महेंद्र ठाकरे, साईनाथ वाघ, गजानन चौधरी, प्रमाेद चव्हाण, संदिप मोरे, शुभम केदार आदी उपस्थित होते.
आता हयगय करणार नाही
गुटखा, तंबाखूचे सेवन करताना आढळल्यास जागेवरच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, सर्वसामन्य नागरिक कुणीही असेल तरी कारवाई करण्यात येईल. मनपा आवारात धूम्रपान करण्यास मनाई असून, हा नियम सर्वांनी पाळावा. -नितीन कापडणीस, अतिरिक्त आयुक्त, मनपा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.