आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरण:दगडाने ठेचून सुनेने केला सासूचा खून; नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे कौटुंबिक कारणावरून संतप्त सुनेने सासूचा दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी भुरी गणेश पावरा (१९) हिच्याविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील पारसीपाडा येथील गणेश लाला बारेला (२०) हा तरुण यशवंत महाजन यांच्या शेतात कुटुंबीयांसह राखणदार म्हणून काम करतो.

गणेशची पत्नी भुरी ही त्याची आई सियादीबाई यांना सतत त्रास देत होती. त्यामुळे दोघांमध्ये वाददेखील होत असे. या वादानंतर संतप्त भुरीने सासू सियादीबाई यांना दमदाटी करत दांड्याने मारहाण केली. त्यानंतर जखमी सियादीबाई यांना दगडाने ठेचून ठार केले. याप्रकरणी गणेश पावरा याच्या तक्रारीवरून त्याची पत्नी भुरीबाई पावरा हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...