आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संगीत ने चित्रपटनगरीत जुळवले सूर ; शिंदखेड्याचा तरुण म्युझिक डायरेक्टर म्हणून पाडतोय छाप

शिंदखेडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणे ही केवळ मोठ्या शहरांतील तरुणांचीच मक्तेदारी आहे, असा आतापर्यंतचा समज होता. मात्र या समजाला छेद देत शिंदखेडा येथील संगीत पाटील या २५ वर्षीय तरुणाने मुंबईत म्युझिक डायरेक्टर म्हणून आपले बस्तान बसवले आहे.

संगीत क्षेत्रात करिअर करणारा तो तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातील पहिला आणि एकमेव तरुण ठरला आहे. गाण्याच्या कम्पोझिशनसह त्याबाबतच्या म्युझिकचे प्रोग्रामिंग आणि गायनही तो आता लीलया करू लागला आहे. नुकताच त्याने संगीतबद्ध केलेला लंडन यूके फिल्म प्राॅडक्शनचा “लंडन पंडित” हा चित्रपट ओटीटी प्लेटफाॅर्मवर प्रदर्शित झाला. याआधी जूनमधे त्याचे “फ्यूजन म्युझिक” असलेला “रुद्र अवतरण’ हा अल्बम हीट झाला आहे. शहरातील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयातील ज्येष्ठ लिपिक अनिल पाटील यांचा तो मुलगा आहे. बारावीनंतर नंतर त्याने शास्त्रीय संगीतात बी.ए.केले. पाश्च्यात्त्य संगीतातील लंडनच्या ट्रिनिटी विद्यापीठाची पदवीही मिळवली. नंतर त्याने मुंबई गाठली. तेथे काही काळ प्रयत्न केल्यानंतर “तू मिला” या अल्बम ला संगीत देण्याची त्याला संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने करून दाखवले. त्यानंतर म्यूझिक डायरेक्टर म्हणून त्याला खरी ओळख मिळाली. अल्बमवर त्यांचे नाव म्युझिक डायरेक्टर म्हणून लिहिले जाऊ लागले. नंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलेच नाही.

संगीत असे करतोय करिअर
त्याने “अनमोल बिटीया”या शाॅर्ट फिल्मला संगीत दिले. “ऊड जा--ऊड जा रे “ या झी म्युझिक प्रदर्शित गाण्याचे स्वत:च गायन करून संगीतही दिले. यूके लंडन फिल्म प्राडक्शनच्या “जॅकपॉट “या इंग्लिश चित्रपटाला देखील पार्श्वसंगीत दिले आहे. सदर फिल्म ओटीटी वर प्रदर्शित झाली आहे. भारतीय आणि पाश्च्यात्य संगीताचा मिलाफ असणारे “फ्यूझन म्युझिक”चे त्यांचे कार्यक्रम जयपूर, जोधपूर, चेन्नई, दिल्ली, मथुरा, देहराडून, कोल्हापूर आदी ठिकाणी झाले.

मुलाने केले स्वप्न पूर्ण
माझे स्वप्न माझा मुलगा पूर्ण करतो आहे. याचा मला आनंद आहे. अजून त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या तो पूर्ण करेल याची खात्री आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे.
अनिल पाटील, वडील

बातम्या आणखी आहेत...