आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाचच दिवस शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर तयारीला वेग देण्यात आला आहे. दुसरीकडे प्रचार शिगेला पोहाेचला असून रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या नावाचे ईव्हीएममध्ये उद्या बुधवारी (दि.१४) फीडिंग केले जाणार आहे.जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान आहे. त्यात धुळे तालुक्यातील ३३ ग्रामपंचायती आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असून निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर झाले आहे.
धुळे तालुक्यात १३० मतदार केंद्र असून प्रत्येक केंद्रात एक मतदान अधिकारी, तीन सहायक, एक शिपाई व एक पाेलिस कर्मचारी मिळून ७८० कर्मचारी नियुक्त असतील. दहा टक्के कर्मचारी राखीव आहे. प्रत्येक मतदान केंद्रात एक कंट्रोल युनिट व प्रत्येक प्रभागासाठी एक ईव्हीएम असेल. धुळे तालुक्यात दीडशे कंट्रोल युनिट, ईव्हीएमची व्यवस्था आहे.
यंत्राची तपासणी झाली असून उद्या बुधवारी उमेदवारांची नाव इव्हीएममध्ये फीड केली जातील. हे काम शहरातील तांत्रिक विद्यालयात होईल. त्यानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर होणार असल्याची माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांना शनिवारी मतदान साहित्याचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
सरपंचपदासाठी फिक्या निळ्या रंगाची पत्रिका
धुळे तालुक्यातील ३३ पैकी ६ ग्रामपंचायती व ८२ सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे १२० प्रभागात ३२९ जागांसाठी ५४७ उमेदवार रिंगणात आहे. सरपंच पदासाठी ७६ उमेदवार रिंगणात आहे. सरपंचपदासाठी फिक्या निळ्या रंगाची मतपत्रिका असेल. प्रथम सरपंच व नंतर सदस्यांची नावे मतदान यंत्रात फीड होतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.