आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:नरडाणा वि.का. सोसायटीवर विकास पॅनलची सत्ता; चेअरमनपदी धनगर

शिंदखेडा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नरडाणा-पिंप्राड-अजंदे विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर विकास पॅनलने सत्ता मिळवली. सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब बाबूराव धनगर यांची तर व्हाइस चेअरमनपदी रमेश श्यामकांत भामरे यांची निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी एस.डी. कोकणी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. चेअरमनपदासाठी भाऊसाहेब बाबूराव धनगर व व्हाइस चेअरमनपदासाठी अजंदे येथील रमेश श्यामकांत भामरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने दोघांची बिनविरोध निवड झाली.

या वेळी माधुरी मधुकर सिसोदे, अमृत सुकदेव भामरे, रमेश भटा पाटील, सुनील मन्साराम पाटकरी, जगन्नाथ नारायण पाटील आदी उपस्थित होते. प्रथमच धनगर समाजाला चेअरमनपदावर काम करण्याची संधी मिळाली. या वेळी पॅनलचे सत्यजित सिसोदे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सिसोदे, माजी सरपंच उपेंद्र सिसोदे, दिनेश गुलाबराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्योती दिनेश पाटील, माजी सरपंच शिवप्रिया उदय सिसोदे, कल्पना उपेंद्र सिसोदे, मनीषा जितेंद्र सिसोदे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ओंकार सिसोदे, जिजाबराव सिसोदे, गणेश मोरे, पंढरीनाथ सिसोदे, पीरन सिसोदे, अनिल सिसोदे, युवराज भामरे, अजय भामरे, पांडुरंग मराठे, पवन भामरे, वसंत भामरे, जिजाबराव पाटील, रवींद्र भामरे, हिरामण बागूल, ग्रामपंचायत सदस्य निखिल सिसोदे, विनीत सिसोदे, रंजन पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...