आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर घर तिरंगा उपक्रम:4 लाख 9 हजार घरांवर फडकणार राष्ट्रध्वज ; जिल्हाभरात विविध स्पर्धा

धुळे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम राबवला जाईल. जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ९ हजार घरांवर राष्ट्रध्वज फडकेल. तसेच जिल्हाभरात विविध स्पर्धा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मनपा आयुक्त देवीदास टेकाळे, उपायुक्त संगीता नादुंरकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मळोदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरावर राष्ट्रध्वज फडकवल्यावर तो सायंकाळी उतरवण्याची गरज नसेल.

पण शासकीय कार्यालयांना ध्वज संहिता पाळावी लागेल. जिल्ह्यात ४ लाख ९ हजार २७१ घरे, ४ हजार ३८८ दुकाने, ३ हजार ४५८ व्यापारी संस्था, १ हजार ६३ हाॅटेल, १ हजार ८७० शैक्षणिक संस्था, १२ हजार ३४६ बचतगट, २ हजार २७६ अंगणवाडीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियोजन आहे. आत्तापर्यंत १ लाख २८ हजार ६१८ ध्वज उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा परिषदेने ७० हजार, मनपाला ४० हजार, नगरपालिका स्तरावर १८ हजार ६१८ ध्वजांची मागणी नोंदवण्यात आली आहे. ६० हजार ध्वज जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. टपाल कार्यालयातून ८ हजार ध्वजांची विक्री होईल, असेही ते म्हणाले. संदीप मळोदे म्हणाले की, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्रामध्ये ध्वज फडकेल.

बातम्या आणखी आहेत...