आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवपुरातील गायत्री प्रज्ञापीठातर्फे गायत्री जयंतीनिमित्त नऊकुंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम देवपुरातील गायत्री प्रज्ञापीठात झाला. याप्रसंगी गायत्री परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे प्रज्ञापीठात संपूर्ण धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. गायत्री जयंती, गंगा दशहरा आणि गायत्री परिवाराचे संस्थापक आचार्य श्रीराम शर्मा यांची पुण्यतिथी असा तिहेरी योगानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती शीतल नवले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे यज्ञ संचालन जगदीश भागवत, प्रा. सतीशचंद्र पाटील यांनी केले. यज्ञानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख ट्रस्टी एन. के. उपाध्ये, उपप्रमुख सुधाकर बेंद्रे, दिलीप चाैधरी, प्रकाश बागुल, ड़ॉ. लीलाधर आजंदेकर, माधवराव दुसाने, संजय सोनवणे, चित्रा पाटील, राजश्री शेलकर, मंगला पाटील उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.