आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद अशा जयघोषाने शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षातील कार्यक्रमाची सुरुवात १ ऑगस्टपासून करण्यात आली.
तालुका प्रशासन व दैनिक पत्रकार संस्था यांनी देशभक्तीपर गीतगायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन केले. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक, घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे यासाठी नगर परिषदेच्या सुरूपसिंग नाईक नगर भवनात या स्पर्धा झाल्या. अध्यक्षस्थानी आमदार शिरीष नाईक तर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी मनीषा खत्री उपस्थित हाेत्या.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा हेमलता पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करणवाल, माजी जि.प. अध्यक्ष भरत गावित, उपनगराध्यक्ष अयुब बलेसरिया, जि.प. सदस्या संगीता गावित, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर, गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले.विद्यार्थ्यांनी जिवंत देखाव्यासह नृत्य सादर केले. १९६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल स्वातंत्र्यदिनी घोषित केला जाणार असून, बक्षीस वितरणही होईल, अशी माहिती पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.