आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचलन:पथसंचलन; आज हिंदू जनआक्रोश मोर्चा

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून रविवारी सकाळी निघाणाऱ्या हिंदू जनआक्रोश मोर्चा संदर्भात पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे २५५ जण बंदोबस्तावर असतील. तर शनिवारी सायंकाळी पोलिस प्रशासनाने शहरातून संचलन केले. यात अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या वतीने रविवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळापासून या मोर्चाची सुरुवात होणार आहे. त्या निमित्ताने शहरातील सामाजिक स्वास्थ कायम राहावे यासाठी बंदोबस्त जाहीर झाला आहे.

असा असेल बंदोबस्त
त्यानुसार ७ पोलिस निरीक्षक, १३ सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, ११५ कर्मचारी, सुमारे ७५ कर्मचारी असलेले शीघ्रकृती दलाचे ३ पथक, राज्य राखीव पोलिस दलाचे ६५ कर्मचारी असे एकूण २५५ सुरक्षा कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहे. या शिवाय फिक्स पॉईंट देखील निश्चित करुन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. बंदोबस्त जाहीर झाल्यानंतर सायंकाळी मोर्चाच्या मार्गाने पोलिसांनी संचलन केले.

या मार्गावरून केले पथसंचलन : चाळीसगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, पाचं कंदील चौक, काराचीवाला चौक, फुलवाला चौक, महाराणा प्रताप पुतळा, झाशी राणी पुतळा, महापालिका समोरुन साक्री रोड ने क्युमाईन क्लब मार्गे हे संचलन केले. अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डीच्या मार्गदर्शनाखाली संचलन केले.

बातम्या आणखी आहेत...