आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नवरात्र ते दिवाळी तेराशे घर; जमिनीचे व्यवहार, सुटीचा नोंदणीवर परिणाम

नीलेश भंडारी | धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्र ते दिवाळी दरम्यान अनेकांनी नवीन वस्तू, सोने-चांदीचे दागिने, वाहन, जमीन, घर खरेदीला प्राधान्य दिले. नवरात्र ते दिवाळी अर्थात आॅक्टाेबर महिन्यात शहरात जवळपास १ हजार ३०० घर, प्लॅट, जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात झाली. हे प्रमाण सरासरी इतकेच असले तरी सलग आलेल्या सुटीमुळे नोंदणीवर परिणाम झाल्याची शक्यता आहे.

यंदा नवरात्र ते दिवाळीनंतर दरम्यान अनेकांचे नवीन घरात जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तसेच काहींनी जमीन खरेदी करून घराचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. काहींनी अपार्टमेंटमध्ये प्लॅट खरेदी केला. शहरात तीन दुय्यम निबंधक कार्यालय आहे. या कार्यालयात आॅनलाइन पद्धतीने जागा, घर, प्लॅट खरेदी-विक्रीची नोंद हाेते. यंदा दसरा, दिवाळी एकाच महिन्यात हाेते.

त्यामुळे शासकीय कार्यालयांना ऑक्टोबर महिन्यात १२ ते १४ दिवस सुट्या असल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर झाला. दसरा, दिवाळीला अनेकांनी नवीन घर, जमिनीची खरेदी केली. मात्र, आॅक्टाेबरमध्ये नेहमीपेक्षा कमी नाेंदणी झाल्याचे दिसून येते. आॅक्टाेबर महिन्यात जवळपास तिन्ही कार्यालयात १ हजार २५९ व्यवहाराची नाेंद झाली. दसरा, दिवाळी असली तरी नाेंदणी सरासरी इतकीच झाल्याची माहिती सहायक दुय्यम निबंधक कार्यालयाचे दुय्यम निबंधक एस. एम. पाटील यांनी दिली.

विशेष फरक नाही
दसरा, दिवाळीत दस्त नाेंदणीत विशेष फरक नाही. दरमाह साधारणपणे हाेणाऱ्या दस्तनाेंदणी इतकेच दस्त नाेंदले. कदाचित अधिक सुट्ट्या असल्याने नोंदणी कमी प्रमाणात झाली असावी. काहींचे व्यवहार पूर्ण झाले नसतील त्यामुळे त्यांनी नाेंदणी केलेली नसेल.-आर. एम. दाेंदे, दुय्यम निबंधक, नाेंदणी कार्यालय

सरासरी साडेचारशे ते पाचशे व्यवहाराची हाेते दस्त नाेंद
शहरातील तिन्ही दुय्यम निबंधक कार्यालयात दरमहा सरासरी साडेचारशे ते पाचशे दस्तांची नाेंदणी केली जाते. गेल्या तीन ते पाच वर्षांत दरमाह नाेंदणीच्या संख्येत २० ते २५ इतकी वाढ झाली आहे. अनेकदा दस्तनाेंदणी करताना सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण येते. त्यामुळे दिवसाला सरासरी बारा ते पंधरा दस्तांची नाेंदणी केली जाते.

बातम्या आणखी आहेत...