आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नवापुरात पर्यावरण पूरक मूर्तींना आकार; संगीता साळुंखेंचा गृहिणीपासून ते गणेशमूर्तिकारपर्यंत प्रवास

नवापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणतेही काम मनापासून हाती घेतले तर ते कार्य यशस्वी होऊन ती कला साकारते. अशाच कलेची जोपासना नवापूर शहरातील संगीता राजेंद्र साळुंखे-मारवाडकर या गणेशमूर्ती तयार करून करीत आहेत. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवून त्या पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहेत.गेल्या दोन वर्षांपूर्वी मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याचे त्यांच्या मनात आले. त्यांनी ओल्या काळ्या मातीला बाप्पाचा आकार देण्याचा प्रयत्न केला. बघता बघता त्यातून खूप छान मूर्तीने आकार घेतला. ते पाहिल्यानंतर त्यांनाही नवल वाटले. यामुळे त्यांनी मूर्ती बनवण्याचे नवे तंत्र अभ्यासले. आपण कुठे चुकलो हे निरखून पाहिले. त्यांनी अनेक प्रकारच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती साकारल्या.

गेल्या वर्षापासून अनेक शाडूच्या मातीच्या मूर्ती त्यांच्या कलेतून तयार होत आहेत. अनेक गणेशभक्तांना त्यांनी शाडूच्या मातीच्या मूर्ती घेण्यास प्रवृत्त केले. पर्यावरणाविषयी जनजागृती करून पर्यावरणपूरकचा संदेश घरोघरी पोहाेचवण्याचे सामाजिक कार्य हाती घेतले. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून शाडूच्या मूर्ती गणेशभक्तांच्या पसंतीस उतरल्या आहेत. अनेक भक्तांकडून मागणी होत आहे. विशेष म्हणजे भक्तांनी पुढील वर्षासाठी आताच मूर्ती बुकिंग केल्या आहे. कुणाचीही मदत व कुठलेही साहित्य न वापरता केलेल्या मूर्ती आकर्षित करत आहेत. त्यांना यासाठी पती तसेच नणंद जया नेरे प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या कलेचे कौतुक होत आहे. त्या नवापुरातील शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नवापूर येथील क्रीडाशिक्षक राजेंद्र साळुंखे यांच्या पत्नी आहेत.

बातम्या आणखी आहेत...