आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:शैक्षणिक सुविधांसाठी राष्ट्रवादीने घातला शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव

धुळे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जयहिंद संस्थेच्या बालमंदिरातील स्वच्छतागृहाची नियमित सफाई करावी, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसावे, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. तसेच निवेदन देण्यात आले.

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सरोज कदम, पालक ललित मोहिते, मोनिका पाटील, किर्ती चित्ते, गायत्री चौधरी, संदीप हजारे, सचिन मराठे, दिनेश वानखेडे, अनिल फुलपगारे, वर्षा पाटील, पूनम साळुंखे, गायत्री पवार, सुनित लोहार, कविता महाजन, संदीप पवार आदी सहभागी झाले होते. जयहिंद बालमंदीरातील वर्ग, जीना, स्वच्छतागृहाची एक दिवसाआड फिनाईलने स्वच्छता करावी.

त्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही. शाळेच्या आवारात स्वच्छता करण्यात यावी. दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्यावी. तुटलेले बाक बदलावे, शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला

बातम्या आणखी आहेत...