आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील पाच पैकी तीन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार निवडून आणू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रभारी अनिल गाेटे यांनी तर जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आणू, असे आश्वासन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना दिले. दरम्यान, सध्या जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे १ तर धुळे जिल्ह्यात एकही आमदार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस भवन इमारतीच्या नूतनीकरणाचे शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्धघाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार एकनाथ खडसे, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, पक्षाचे खजिनदार हेमंत टकले, जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे, राष्ट्रवादीचे महानगरप्रमुख रणजित भाेसले, माजी मंत्री डाॅ. हेमंत देशमुख, माजी आमदार रामकृष्ण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, डाॅ. जितेंद्र ठाकूर, ज्याेती पावरा, एन. सी.पाटील, पाेपटराव साेनवणे आदी उपस्थित हाेते. अनिल गाेटे म्हणाले की, जिल्ह्यात पक्षाच्या १० हजार सदस्यांची नोंदणी केली. प्रत्येक तालुक्यात मेळावे घेतले जात असून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी म्हणाले की, पक्षाचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू आहे. महाराष्ट्र बळकट करावयाचा असे तर पक्ष बळकट झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
मल्हार बागेतील भाेजन रद्द; भाेसलेंच्या घरी भेट
शरद पवार यांच्या नियाेजित दाैऱ्यात अचानक बदल झाले. त्यामुळे अनिल गाेटे यांंच्या मल्हार बागेतील पत्रकार परिषद व विविध शिष्टमंडळांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम रद्द झाला. मेळाव्यानंतर शरद पवार यांनी महानगरप्रमुख रणजित भाेसले यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेथून ते नाशिकला गेले.
अनेकांनी लावली उशिरा हजेरी
नियाेजनानुसार दुपारी १२ वाजता मेळावा हाेणार हाेता. पण शरद पवार सकाळी अकरा वाजताच शहरात आले. त्यानंतर साडेअकरा वाजता मेळावा सुरू झाला. तेव्हा अनेक जण आलेले नव्हते. त्यामुळे मंडप रिकामा होता. नंतर मात्र तो भरला. महिला पदाधिकारी एक वाजेच्या सुमारास कार्यक्रम संपल्यानंतर पुष्पगुच्छ घेऊन आल्या.
भाजपचे जि.प. सदस्य पहिल्या रांगेत
कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे पहिल्या रांगेत बसले हाेते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोंडाईचा येथे आलेले असताना भामरे यांनी शरद पवार यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच भाजपचे एक माजी सिनेट सदस्यही कार्यक्रमस्थळी दिसून आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.