आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:श्रावणी रेल्वे गेटजवळ; डंपर अन् रिक्षाच्या अपघात सहा जण गंभीर जखमी

खांडबारा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर तालुक्यातील श्रावणी रेल्वे गेट जवळ डंपर आणि रिक्षाच्या भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.खांडबारा नजीक श्रावणी रेल्वे गेटजवळ प्रवाशी रिक्षा (क्रमांक जीजे ३८, डब्ल्यू १५४८ ही डोगेंगावहून खांडबाराच्या दिशेने येत असताना डंपर (जीजे १६, एक्स ८३५९) हा श्रावणी रेल्वे गेटच्या दिशेने जात असताना रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की अपघात होताच मोठा आवाज झाला. आजूबाजूचे लोकांनी आवाज ऐकून अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. एका खाजगी वाहनाने अपघातग्रस्तांना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात सुरेश संजय गावित, सविता अनिस वळवी (रा. जामदा), अमिरा दिनेश वळवी (रा. मौलीपाडा), भामटी अरविंद (रा. मौलीपाडा), अनेस तिकडे (रा. जामदा) व रिक्षाचालक असे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना डोक्यावर तोंडावर हातापायाला गंभीर दुखापत झाली आहेत. तसेच तीन रुग्णांना गंभीर इजा झाल्याने त्यांना खांडबारा येथे प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच खांडबारा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी वाहतुकीची कोंडी सुरळीत केली.

बातम्या आणखी आहेत...