आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद , म्‍हणाल्‍या:धर्मांतरबंदीच्या कायद्याची आवश्यकता

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलींना लग्नासह विविध अामिषे दाखवून पळवून नेत त्यांचे धर्मांतर केले जाते. या प्रकारला अाळा बसण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा असणे आवश्यक आहे. अधिवेशनात चर्चा हाेऊन लवकरच धर्मांतरबंदी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न होतील. तसेच बचत गटांना बाजारपेठ मिळवून देऊ, अशी माहिती भारतीय जनता पक्ष महिला माेर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजप महिला माेर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ राज्यभरात दौरा करत आहेत. त्यानुसार त्या रविवारी शहरात आल्या होत्या. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वाघ म्हणाल्या की, राज्यात महिला सुरक्षेचा विषय महत्त्वाचा आहे. या प्रश्नावर भाजप महिला माेर्चाच्या माध्यमातून काम सुरू आहे. महिलांशी संबंधित दाखल हाेणाऱ्या गुन्ह्याला राजकीय रंग देऊ नये. धुळ्यातील धर्मांतर प्रकरणाची माहिती पोलिसांकडून घेतली. या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने होईल, असे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...