आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:जवखेडा-अंतुर्ली रस्ता नाल्यावर पुलाची गरज

तऱ्हाडी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील जवखेडा-अंतुर्ली रस्त्याला एकच नाला दोन वेळा छेदतो. जवखेडा गावाच्या पुढे या नाल्यावर एक पूल बांधण्यात आला आहे. नवी अंतुर्ली गावानंतर जुन्या अंतुर्लीकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर तळफरशी आहे. ही तळफरशी मागील पावसाळ्यात वाहून गेली. या ठिकाणी नव्याने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी होते आहे.

जवखेडा-अंतुर्ली रस्त्यावरील नाला जळोद धरणाचा मुख्य नाला आहे. धरण भरल्यानंतर या नाल्याला पूर येतो. नाल्यावर असलेल्या फरशीवर पंधरा ते वीस फूट पाणी असते. त्यामुळे जुनी अंतुर्ली ते नवी अंतुर्ली, जवखेडा तसेच शिरपूरकडे जाणारी वाहतूक बंद होते. या पुलाची गेल्यावर्षी पावसाळ्यात दुरवस्था झाली होती. त्यानंतर त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यासाठी आमदार काशिराम पावरा व आमदार अमरीश पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांना निवेदन देण्यात आले आहे. पण दोन वर्षांपासून ही मागणी पूर्ण झालेली नाही. हे काम झाले नाही तर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ जवखेडा वरुळ येथे शिरपूर-शहादा रस्त्यावर आंदोलन करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...