आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवी जीवनात मातृभाषेला अनन्य साधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून याच भाषेतून प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे. पण इंग्रजी भाषेशी भांडण नसावे. कारण मराठी जीवन जगण्याची, इंग्रजी जागतिक व्यवहाराची तर हिंदी राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे मराठी-हिंदी सोबतच इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जयहिंद महाविद्यालयातील निवृत्त प्रा. डॉ. शोभा शिंदे यांनी केले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या ग्रंथालय विभागातर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम झाला.
त्या वेळी त्या बोलत होत्या. डॉ. एन. के. वाणी अध्यक्षस्थानी होते. या वेळी राजवाडे ग्रंथालयाच्या चिटणीस जयश्री शहा, मंडळाचे संशोधन अधिकारी प्रा. पी. बी. गायकवाड, क्युरेटर श्रीपाद नांदेडकर आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. शोभा शिंदे म्हणाल्या की, मराठी भाषेचा उगम विषय विहंगम आहे. चौथ्या-पाचव्या शतकापासून मराठी भाषेचा विकास झाला आहे. त्या काळी ही भाषा लिखित नसली तरी ताम्रपत्र, शिलालेख स्वरूपात मराठीचे अस्तित्व आढळते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना मराठीचा गौरव केला. संत ज्ञानेश्वरांनी श्रीमद्भगवतगीता सामान्यांपर्यंत पोहाेचवण्यासाठी मराठी भाषेचा वापर केला. मराठी भाषेच्या विकासासाठी सर्वांनी पुढे यावे, असेही त्या म्हणाल्या. या वेळी पिंपळनेरचे प्रशांत कोतकर यांनी मनोगत व्यक्त केले. सहायक ग्रंथपाल रेणुका शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी, राजश्री भडांगे, सोनाली वाघ, भूषण बर्गे, राधेश्याम वर्मा, गुलाब भील, दुर्गेश जोशी, परेश चंद्रात्रे आदींनी संयोजन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.