आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तांतर:बाजार समितीवर नवीन प्रशासक मंडळ नियुक्त ; मुख्य प्रशासकपदी जयसिंग गिरासे यांची निवड

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सत्तांतर झाल्यावर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेले अशासकीय प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले. आता नवीन अशासकीय प्रशासक मंडळ नेमले आहे. याविषयीचे आदेश पणन संचालक तथा जिल्हा उपनिबंधकांनी दिले. नव्या प्रशासक मंडळाने मंगळवारी पदभार स्वीकारला. बाजार समितीवर मुख्य प्रशासक म्हणून बेहेडचे माजी सरपंच जयसिंग गिरासे यांची नियुक्ती झाली आहे.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांची मुदत संपली आहे. मात्र, निवडणूक लांबणीवर पडल्याने महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत बाजार समितीवर प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. सत्तांतर झाल्यावर आता पुन्हा नव्याने प्रशासक मंडळ नियुक्तीचे आदेश मंगळवारी देण्यात आले. त्यानुसार समितीच्या मुख्य प्रशासकपदी बेहेडचे माजी सरपंच जयसिंग गिरासे यांची नियुक्ती झाली. तसेच प्रशासक मंडळात भाऊसाहेब देसले (विंचूर), संदीप पाटील (बुरझड), आधार खेडकर (सडगाव), भावलाल पाटील (धाडरी) यांचा समावेश आहे. मंडळाने मंगळवारी पदभार स्वीकारला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कामराज निकम, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संग्राम राजपूत, बापू पवार, नंदू पाटील, सुनील बैसाणे, नाना साळवे, सुदाम महाजन, खुशाल कोळी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...