आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नवीन सीईओ संगणक अभियंता; आई-वडील रोल मॉडेल, आजीला वाटायचे नातीने चूल, मुलमध्ये अडकण्यापेक्षा उच्च अधिकारी व्हावे; गाणे ऐकण्यासह मुलासोबत वेळ घालवणे आवडते, धुळ्यात शिक्षण, आरोग्यावर

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस संगणक अभियंता आहे. सरकारी सेवेत येण्यापूर्वी त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली आहे. आई-वडीलांसह आजी त्यांच्या रोल मॉडल आहे. सीईओ भुवनेश्वरी एस यांच्या आजीला नात उच्चपदावर जावी असे वाटायचे. त्यामुळे आजीचे स्वप्न सीईओ भुवनेश्वरी एस यांनी आयएएस अधिकारी होत पूर्ण केले. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता पदभार स्विकारला. त्यानंतर उद्या शनिवारी त्या सकाळी अकरा वाजता सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतील. दरम्यान, मावळत्या सीईओ वान्मथी सी सकाळी रवाना झाल्या.

सीईओ वान्मथी सी यांच्या जागेवर नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांची गुरूवारी बदली झाली होती. त्या सायंकाळी ५ वाजता मनमाडला आल्या. तेथून सायंकाळी साडेसात वाजता जिल्हा परिषदेत येत त्यांनी पदभार घेतला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी स्वागत केले. नवीन सीईओंना गाणे एेकणे व तसेच मुलासोबत वेळ घालवणे आवडते.

बातम्या आणखी आहेत...